youth from salaidabha got two different report of corona in hingana of nagpur 
नागपूर

"अहो साहेब, तुम्हीच सांगा मी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह"? एकाच दिवशी दोन वेगवेगळे चाचणी अहवाल 

जितेंद्र वाटकर

टाकाळघाट(जि. नागपूर) - राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यातच आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळे अहवाल मिळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सालईदाभा येथील तरुणाला दोन वेगवेगळे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे आता 'मी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; हे तुम्हीच सांगा, असा सवाल प्रशसनाला केला आहे.

बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रामध्ये एका कंपनीत कंत्राटी कामगारांची नोकरभरती सुरू होती. संबंधित तरुण बेरोजगार असल्याने कामासाठी कंपनीत गेला. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने त्याला स्वतःची कोरोना चाचणी करायला सांगितली. त्यानंतर त्याने कान्होलीबारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्याला कुठलीही लक्षणे नसल्याने त्याने बुटीबोरीच्या खासगी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. एकाच दिवशी दोन वेगवेगळे अहवाल प्राप्त झाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. हा प्रकार या तरुणाशीच नव्हेतर गावातील इतर नागरिकांशी घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच त्यांनी कोरोना चाचणीच्या कीटबाबत देखील शंका उपस्थित केली.

सरकारी रुग्णालयाचाच अहवाल ग्राह्य धरावा - 

तरुणाने वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना चाचणी केल्यावर त्याचा प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या  रेपीड अँटीजेन चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह असल्यास तो खरा समाजावा.  खासगी रुग्णालयामध्ये त्याने पुन्हा तपासणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह येत असेल तर  त्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील अहवाल गृहीत धरावा.

कारण खासगी रुग्णालयात चाचणी करतेवेळी स्वॅब व्यवस्थित घेण्यात आला नाही तर त्याचा अहवाल निगेटिव्ह येवू शकतो. इतकेच नव्हे तर रेपीड अँटीजन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह येत असेल आणि त्याबाबत काही शंका असल्यास त्यांनी थेट आर्टिपिसीआर टेस्ट करावी. त्यामध्ये आलेला अहवाल हा निश्चितच खरा येत हिंगणा तालुका वैद्यकीय अधिकारी प्रविण पडवे यांनी सांगितले.

संपादन - भाग्यश्री राऊत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT